HRA Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA नियमांत मोठा बदल, पगारात होणार थेट वाढ की फटका? जाणून घ्या काय झाला बदल

HRA Rules Explained: सरकारी कर्मचाऱ्यांनी HRA घेताना मालकी, सरकारी निवासस्थान, बदलीनंतरचे नियम आणि करसवलीच्या अटी तपासणे महत्त्वाचं आहे.
Government Employees Alert
Government Employees Alertmeta ai
Published On: 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरभाडं भत्ता म्हणजेच HRA (House Rent Allowance) मिळतो. पण फक्त भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे HRA मिळतोच असं नाही. HRAचा दावा करताना कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे HRA घेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे.

HRAचा दावा करताना कर्मचारी ज्या घरात राहतायेत ते घर स्वत:चं, पती किंवा पत्नीचं, मुलांचं किंवा आई- वडिलांचं आहे की भाड्याने घेतलंय, याची माहिती द्यावी लागते. यासाठी कर्मचाऱ्याला काही महत्त्वाची प्रमाणपत्रही सादर करावी लागतात.

सरकारी घर मिळालं असेल तर HRA नाही?

समजा, एखाद्या कर्मचाऱ्याला सरकारी निवासस्थान मिळालं असेल, तर ते त्याच्या आई-वडिलांना किंवा मुलाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे, तर त्या कालावधीसाठी HRA घेता येत नाही. सरकारी संस्था, स्वायत्त संस्था किंवा इतर सरकारी संस्थेकडून मिळालेल्या निवासस्थानालाही हा नियम लागू होतो.

Government Employees Alert
DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

तसेच कर्मचाऱ्याच्या पती किंवा पत्नीला त्याच शहरात सरकारी घर मिळालं असेल, तर त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. पती, पत्नी, मुलं किंवा आई-वडिलांसोबत सरकारी निवासस्थानात राहत असेल तर त्यासाठी HRA चा दावा करता येत नाही.

Government Employees Alert
Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

ट्रान्सफरनंतरही नियम लागू

कर्मचाऱ्याची बदली किंवा पोस्टिंग बदलल्यावर HRA चे नियमही बदलू शकतात. बदलीनंतर काही काळ सरकारी विश्रामगृह, स्टेट भवन किंवा विभागीय गेस्ट हाऊसमध्ये राहून भाड्याची प्रतिपूर्ती मिळत असेल, तर त्या वेळेसाठी HRA मिळत नाही. सरकारी निवासस्थान मिळाल्यानंतरही सामान्यत: HRA बंद होतो.

HRA च्या टॅक्स बेनिफिटकडेही लक्ष द्या

HRA ची संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री नसते. कलम 10(13A) अंतर्गत HRA करसवलत जुन्या कर व्यवस्थेत मिळते. नव्या कर व्यवस्थेत ही सवलत उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भरलेल्या भाड्याच्या पावत्या, पेमेंटचे रेकॉर्ड आणि संबंधित कागदपत्रे जपून ठेवाव्यात. चुकीच्या पद्धतीने HRA करसवलत घेतल्याने जास्त करासोबत व्याजही भरावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com