Sakshi Sunil Jadhav
सध्या २४ वर्षीय विवेकानंद मारुती पाटील याची परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात झालेल्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
विवेकानंद मारुती पाटील याने कुरुकली ईथल्या भोगावती महाविद्यालयातून दोन वर्षांआधी राज्यशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच विवेकानंदने MPSC परीक्षेची तयारी सुरू केली असून आतापर्यंत दोन प्रयत्न केले आहेत.
आता तो दुसऱ्यांदा मराठी माध्यमातून UPSCची परीक्षा देण्याच्या तयारीत आहे.
विवेकानंदचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे; त्याची बहीणही MPSCची तयारी करत आहे.
कोल्हापुरातल्या MPSC आंदोलनात त्याने केलेल्या प्रभावी भाषणाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा संघर्ष मांडताना त्याने म्हैस विकून UPSCची तयारी केल्याचा भावनिक संदर्भ देत पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित केले.
प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, कन्फ्युशियस यांच्यासह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव ढसाळ आणि इम्रान प्रतापगढींचे संदर्भ त्याने भाषणात दिले. २०२२ पासून विविध विद्यार्थी आंदोलनांत सहभागी असलेल्या विवेकानंदच्या वक्तृत्वाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सतेज पाटील यांनीही कौतुक केले आहे.