PM Kisan Yojana : एकाच घरातून २-२ जणांनी घेतले योजनेचे पैसे! सन्मान निधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, 'या' लोकांची यादी तयार

PM Kisan Scheme Under Scrutiny: पीएम किसान योजनेच्या फार्मर रजिस्ट्रीमध्ये पती-पत्नी दोघेही सन्मान निधीचा लाभ घेत असल्याची १२०० प्रकरणं समोर आली.
PM Kisan Samman Nidhi
PM Kisan Samman Nidhimeta ai
Published On: 

PM Kisan Yojana : सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यातीलच पीएम किसान योजनेचा लाभ ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. पण या योजनेसंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कुटुंबातून पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर योजनेचा लाभ घेतला जास असल्याची जवळपास १,२०० प्रकरणं आढळली आहेत.

शासनाच्या नियमानुसार, एका कुटुंबातल्या पात्र शेतकऱ्यालाच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे. मात्र, फार्मर रजिस्ट्रीच्या प्रोसेसदरम्यान काही कुटुंबांमध्ये नवरा आणि बायको या दोघांच्याही नावावर योजनेचा लाभ सुरू असल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे संबंधित प्रकरणं आता विभागीय तपासणीसाठी वेगळी करण्यात आली आहेत.

PM Kisan Samman Nidhi
Sleep Problems : सावधान! रात्री अचानक जाग येतेय? या आजाराची असू शकतात लक्षणं

३.१४ लाख शेतकऱ्यांची फार्मर रजिस्ट्री पूर्ण

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ४.०७ लाख शेतकरी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३.१४ लाख शेतकऱ्यांची फार्मर रजिस्ट्री पूर्ण झाली आहे. या प्रोसेसदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध कागदपत्रांची आणि उपलब्ध नोंदींची पडताळणी केली जातेय.

PM Kisan Samman Nidhi
Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

याच तपासणीमध्ये एकाच कुटुंबातल्या नवरा-बायको अशा दोघांचीही नावं पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचा डेटा स्वतंत्रपणे तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.

कागदपत्रांची पुन्हा तपासणी होणार

विभागाकडून आता संबंधित शेतकऱ्यांच्या कागदपत्रांसह योजनेच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी केली जात आहे. तपासणीनंतर कोण पात्र आहे आणि कोण नियमांच्या विरोधात लाभ घेत आहे, हे स्पष्ट होणार आहे.

जर एखाद्या कुटुंबात नवरा- बायको मिळून नियमांनुसार अपात्र आढळलं किंवा दोघांच्या नावावर लाभ घेणं नियमबाह्य असल्याचं सिद्ध झालं, तर निर्धारित प्रोसेसनुसार एका लाभार्थ्याचे नाव योजनेतून हटवलं जाऊ शकतं.

फार्मर रजिस्ट्री पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थ्यांची यादी जास्त अचूक करण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही विसंगती असेल तर ती वेळेत दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com