Sakshi Sunil Jadhav
बदलत्या जीवनशैलीमुळे रात्रीच्या झोपेच्या वेळेमध्ये खूप बदल झाले आहे. लोक रात्री उशीरापर्यंत जागे राहत असात.
बऱ्याच जणांना झोप लागल्यावर काहीच वेळाच अचानक जाग येते. ही समस्या काहींना सामान्य वाटते.
जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस आळस येतो.
रात्री अचानक जाग येण्याचं प्रमुख कारण हे ताण आहे. तुम्ही चिंतेत असाल तर तुम्हाला रात्री झोप लागत नाही.
बऱ्याचदा काहींना त्यांच्या झोपची जागा बदलल्यावर रात्री झोप येत नाही.
काही व्यक्तींना स्लीप एपनियाचा धोका असेल तर त्यांना रात्रीत अचानक जाग येऊ शकते.
स्लीप एपनियामध्ये व्यक्तीचा श्वास थांबू शकतो, घोरणं वाढतं आणि गुदमरल्या सारखं वाटतं.
तुम्हाला जर झोपेतून अचानक जाग येत असेल तर सर्वात आधी झोपेच्या वेळेस फोन वापरणं बंद करा.तसेच तुम्ही झोपताना वाचन किंवा हळू आवाजात संगीत ऐकू शकता.