8th Pay Commission pension hike GOOGLE
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ व्या वेतन आयोगात वयानुसार १००% पर्यंत पेन्शन देण्याची मागणी, पहा नेमका काय आहे प्रस्ताव

8th Pay Commission Pension Hike : आठव्या वेतन आयोगासमोर पेन्शनधारकांनी वयानुसार पेन्शन वाढवण्याची मागणी केली आहे. यामध्ये वाढत्या वयानुसार खर्चही वाढतो ही गंभीर समस्या असल्याचं पेन्शन संघटनांनी सांगितलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीये. वेतनवाढ, महागाई भत्ता आणि इतर आर्थिक लाभांसाठी कर्मचारी संघटनांकडे मागणी करत आहेत. आता पेन्शनधारक संघटनांनी सुद्धा पेन्शन व्यवस्थेतबद्दल काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये वाढत्या वयानुसार पेन्शनच्या रकमेतली वाढ करण्याची मागणी सध्या चर्चेत आहे.

पेन्शन संघटनांच्या मागण्या काय आहेत?

पेन्शन संघटनांचं (8th Pay Commission pension hike)म्हणणं आहे की, रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वयानुसार त्यांच्या आर्थिक गरजा वाढतात. आजारपणाचा खर्च, औषधांचा खर्च आणि इतर जीवनावश्यक खर्च याचा विचार केला तर रिटायरमेंटनंतर जास्त खर्च होतो. त्यामुळे वयाच्या टप्प्यानुसार पेन्शन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

किती टक्के वाढ करण्याची मागणी?

आता प्रस्तावानुसार 65 वर्षे पूर्ण केलेल्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 70 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळायला हवी. 70 वर्षांच्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के, 75 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना 80 टक्के, 80 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना 85 टक्के आणि 85 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना 90 टक्के पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर 90 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगारा ऐवढी म्हणजेच 100 टक्के पेन्शन मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कर्मचारी संघटनांनी पेन्शनविषयी काही आणखी महत्वाच्या मागण्या केल्यात. त्यात किमान पेन्शन ही शेवटच्या वेतनाच्या ६७ टक्क्यांपर्यंत वाढवावी किंवा सेवाकाळातल शेवटच्या दहा महिन्यांच्या सरासरी वेतनाऐवढी असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा केली पाहिजे, महागाई संरचनेत विचार करून ती पेन्शनमध्ये जमा केली पाहिजे आणि कौटुंबिक पेन्शनच्या लाभांत वाढ केली पाहिजे अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT