Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय वाढणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Government Employees Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरंच कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय का? हे जाणून घेऊ.
Government Employees
Government Employees Retirementsaam tv
Published On

तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, तुम्हालाही एक मेसेज आला असेल. त्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय. खरंच कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

सरकारने आता कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचं कालावधी आणखी दोन वर्षे वाढवलाय. आधी रिटारयमेंटचं वय हे 60 वर्षे इतकं होतं. मात्र, आता वय वर्षे 62 केल्याचा दावा करण्यात आलाय.खरंच या दाव्यात तथ्य आहे का? काहींसाठी हा दावा दिलासादायक आहे तर काही कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारा आहे.

आधीच देशात बेरोजगारी आहे.आणखी दोन वर्षे रिटायरमेंटची वाढवली तर नवीन लोकांना संधीसाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागेल...त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्याचे निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे, जे आता 62 पर्यंत वाढवण्यात आलाय. हा मेसेज व्हायरल होत असून, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण, जे काही दिवसातच रिटारर्ड होणार आहेत त्यांना हा नियम लागू होणार आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

देशभरात सरकारी कर्मचारी कोट्यवधींच्या घरात आहेत. त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली.सरकारने असा निर्णय जाहीर केलाय का...? याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Government Employees
No पेपर वर्क! फक्त चेहरा दाखवला तरी बनेल तुमचं UAN; EPFOची नवी सुविधा

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रिटायमेंट वय वाढवलं नाही

कॅबिनेट बैठकीत असा कोणताही निर्णय नाही

2 वर्षे कालावधी वाढवल्याचा दावा संभ्रम निर्माण करणारा

सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेवू नका.

Government Employees
Property Rule: सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा अधिकार असतो का? किती मिळते प्रॉपर्टी?

देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आमच्या पडताळणीत सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटचं वय दोन वर्षांनी वाढवल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com