Sakshi Sunil Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. राज्याभिषेक सोहळा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा ऐतिहासिक क्षण मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा पुढे दिलेल्या मराठी शुभेच्छा पाठवा.
शिवरायांचा तेजोमय इतिहास, स्वराज्याचा गौरवशाली श्वास, राज्याभिषेक दिनी करू वंदन खास, जय शिवरायांचा घुमो सर्वत्र आवाज.
भगवा झेंडा उंच फडकत राहो, शिवरायांचे विचार मनात नांदो, स्वराज्याचा अभिमान वाढत राहो, राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शौर्य, धैर्य आणि स्वाभिमान, शिवरायांनी दिला नवा मान, राज्याभिषेक दिनी करू स्मरण, जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष महान.
रयतेचा राजा, जनतेचा आधार, शिवरायांचा इतिहास अपार, राज्याभिषेक दिनी करू नमस्कार, स्वराज्याचा राहो सदैव विस्तार.
गड-किल्ल्यांचा अभिमान जागवा, शिवरायांचे विचार अंगीकारा, राज्याभिषेक दिन साजरा करा, स्वराज्याचा दीप सदैव तेवत ठेवा.
शिवरायांचे ध्येय आणि प्रेरणा, यातूनच मिळते जगण्याची ऊर्जा, राज्याभिषेक दिनी घ्या नवी शपथ, स्वराज्याचा वाढवूया गौरव अनंत.
स्वराज्याची ही सुवर्ण कहाणी, शिवरायांची अमर निशाणी, राज्याभिषेक दिनाच्या शुभक्षणी, भरभरून लाभो यश आणि आनंदाची खाणी.