Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे थोर गुरु मानले जातात.
चाणक्यांच्या चाणक्य नितीत शांत राहणारे लोक खूप हुशार असतात असं सांगितलं आहे. कारण ते विचार करून प्रत्युत्तर देतात.
पुढील मुद्द्यात आपण शत्रूला कसं हरवायचं तेही न बोलता ? याबद्दल ७ ट्रीक जाणून घेणार आहोत.
चाणक्यांच्या मते, सगळ्यांना तुम्ही योग्य आहात याचे पुरावे देत बसू नका. यात लोक तुमची मजा घेत असतात. तुम्हाला मुर्ख समजतात.
तुम्ही जर कोणालाही प्रत्युत्तर न देता शांत राहीलात. तर समोरचा व्यक्ती तुम्हाला नाही तर बोलणाऱ्याकडे बघतो.
जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा शत्रू अस्वस्थ होतो. तो जास्त बोलतो आणि जास्त चुकाही करतो.
शांत राहणं म्हणजे फक्त मौन पाळणं नाही तर शत्रूवर केलेला एक मोठी हल्ला असतो.
चाणक्यांच्या मते, जेव्हा समोरची व्यक्ती सतत प्रयत्न करते आणि तुम्ही माघार घेत नाही, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट गोष्टी इतरांपर्यंत पसरवते.
तुम्ही बराच वेळ शांत राहा, सर्व गोष्टींचे निरीक्षण करून त्या समजून घ्या आणि मग तुमचं मत एका वाक्यात म्हणा. याने विषय संपेल.