Sakshi Sunil Jadhav
सध्या अनेक गंभीर आजार वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये कॅन्सर या आजाराचा शेवट हा मृत्यूनेच होतो.
कॅन्सरच्या आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. त्यामध्ये वजन कमी होणं, शरीराला सूज येणं, त्वचेत बदल होणं आणि केस गळणं अशा लक्षणांचा समावेश असतो.
आता केस गळती ही अत्यंत सामान्य समस्या मानली जाते. पण अचानक केस गळती वाढली असेल तर ही समस्या दुर्लक्षित करू नका.
तज्ज्ञांच्या मते केस गळती हे कॅन्सरचंच लक्षण नसतं. पण ही समस्या गंभीर आहे. याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे.
केस गळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, तुम्ही घेत असलेला सततचा ताण आहे. यामुळेही केस गळती वाढते.
कामाचा ताण, पैशाची समस्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, अपुरी झोप अशा सर्व कारणांमुळे तुमचे केस गळू शकतात.
केस गळण्यामागे तुमच्या शरीरातली व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता हे कारण असू शकतं.
महिलांमध्ये अचानक केस गळती वाढली असेल तर पीसीओडीची समस्या असू शकते. त्यामुळे तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.