8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फक्त इकता टक्केच पगार वाढणार; नवीन रिपोर्ट समोर

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगात पगारात १३ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार

आठव्या वेतन आयोग किती फिटमेंट फॅक्टर लागणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार यासंदर्भात एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. आता आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त २३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असं समोर आली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज (Kotak Institutional Equities)ने याबाबत रिपोर्ट जारी केला आहे.

काय आहे रिपोर्ट?

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या या रिपोर्टमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. या रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात फक्त १३ टक्क्यांनी वाढ होऊ शकतो. सातव्या वेतन आयोगात १४.३ टक्के पगारवाढ मिळाली होती. परंतु यावेळेस ही पगारवाढ कमी होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यावेळी फिटमेंट फॅक्टर १.८ राहण्याची शक्यता आहे. ७व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ होते. यानुसार, सध्याच्या बेसिक वेतनाला १.८ टक्क्यांनी गुणून निश्चित केले जाईल. दरम्यान, महागाई भत्त्यातील वाढ पहिल्यापासून केली जाईल. यामुळे एकूण पगारात कमी वाढ होण्याची शक्यता आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर मूळ वेतनात वाढ होईल. उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर त्यात १.८ फिटमेंट फॅक्टरनुसार वाढ झाली तर बेसिक पगार ३२००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यात जर सध्याचा महागाई भत्ता (DA Hike) ५५ टक्के जमा केला तर ९,९०० रुपये होईल. याचसोबत एकूण पगार २७,९०० होतो.

ज्यांचे मूळ वेतन ५०,००० रुपये आहे. त्यांचे वेतन ९०,००० रुपयांपर्यंत वाढू शकतात. त्यावर महागाई भत्तादेखील लागू केला जाईल.

आठवा वेतन आयोगाची घोषणा कधी झाली?

आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी २०२५ मध्ये झाली होती.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू होणार आहे. जानेवारी २०२६ पासून येणाऱ्या पगारात आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. परंतु हा पगार तुम्हाला जेव्हा आठवा वेतन कितीने वाढणार हे ठरल्यानंतर येईल. ज्या महिन्यात हा पगार होईल त्या पगारात मागील महिन्यांचेही पैसे येतील.

नवीन वेतन आयोग कधी लागू होतो?

नवीन वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी लागू होतो. मागच्या वेळी २०१६ मध्ये नवीन वेतन आयोग लागू झाला होता. हा सातवा वेतन आयोग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT