8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू; पण पगार कधीपासून वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. यामध्ये पगारवाढ कधीपासून येणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून येणार

एरियर कधी आणि किती मिळणार?

नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. आठवा वेतन आयोग जरी लागू झाला असला तरी त्याची पगारवाढ येण्यात अजून काही दिवस लागणार आहे. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही जानेवारी २०२६ पासून सुरु झाली. परंतु आता जोपर्यंत पगार कितीने वाढणार याबाबत शिफारसींना मंजूरी मिळणार नाही तोपर्यंत काहीच ठरणार नाही.

आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिली आहे. यानंतर सरकारची मंजुरी आल्यानंतर पगारवाढ निश्चित होईल.दरम्यान, आता सरकारी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे.

देशातील ५० लाख कर्मचारी आणि ६९ पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे. याबाबत ऑल इंडिया एनपीएस इम्प्लॉयज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मंजित पटेल यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नियमानुसार १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, शिफारसींसाठी १८ महिन्याचा कालावधी दिला आहे. यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी झाल्यानंतर वेतन आयोग लागू होण्यास ६महिने लागू शकतात.

पगारवाढ कधीपासून मिळणार?

डॉ. मंजित पटेल यांनी सांगितले की, जर ही प्रक्रिया खूप वेळ सुरु राहिली तर जानेवारी २०२८ पर्यंत कर्मचाऱ्यांना वाढीव पगार दिला जाईल. दरम्यान, जुलै २०२७ मध्येही याबाबत घोषणा होऊ शकते. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एरियर कधी आणि कसा मिळणार?

डॉ. मंजीत पटेल यांच्या मते,एरियर हा १ जानेवारी २०२६ पासूनचा असणार आहे. आतापर्यंत नेहमी कर्मचाऱ्यांना एकरकमी एरियर दिला आहे. त्यामुळे यावेळीदेखील एरियर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT