KDMC : महापालिकेचा धुरळा उडाला, पण कर्मचारी गैरहजर; २८ जणांवर गुन्हा दाखल, KDMC आयुक्तांचा अधिकार्‍यांना दणका

Kalyan Dombivli Municipal Corporation 2025-2026 : केडीएमसी निवडणूक २०२५–२६ सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. मात्र निवडणूक कर्तव्यावर हजर न होणाऱ्या २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे.
KDMC : महापालिकेचा धुरळा उडाला, पण कर्मचारी गैरहजर; २८ जणांवर गुन्हा दाखल, KDMC आयुक्तांचा अधिकार्‍यांना दणका
Kalyan Dombivli Municipal Corporation 2025-2026Saam Tv
Published On
Summary
  • १५ डिसेंबरला २९ महापालिकांसाठी मतदान

  • केडीएमसीत निवडणूक ड्युटीवर गैरहजर अधिकारी-कर्मचारी

  • VST, FST, SST व झोनल पथकातील २८ जणांवर FIR प्रक्रिया

  • आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशाने कायदेशीर कारवाई सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली

येत्या १५ डिसेंबर रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ ही निर्विघ्न, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्तव्यावर नेमणूक केली आहे. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचारी अद्याप निवडणूक कर्तव्यावर हजर न झाल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निवडणूक कामासाठी नियुक्त असूनही कर्तव्यावर अनुपस्थित राहिलेल्या, विशेषतः VST, FST आणि SST पथकांतील तसेच झोनल अधिकारी म्हणून नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहायक आयुक्त संदीप रोकडे यांना दिले आहेत. या आदेशानुसार एकूण २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

KDMC : महापालिकेचा धुरळा उडाला, पण कर्मचारी गैरहजर; २८ जणांवर गुन्हा दाखल, KDMC आयुक्तांचा अधिकार्‍यांना दणका
Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

निवडणूक प्रक्रियेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता असून, त्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना कर्तव्यावर हजर होण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे.

KDMC : महापालिकेचा धुरळा उडाला, पण कर्मचारी गैरहजर; २८ जणांवर गुन्हा दाखल, KDMC आयुक्तांचा अधिकार्‍यांना दणका
Maharashtra : नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय

तरीही संबंधित कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्यास, त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा आयुक्तांच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने सर्व नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य गांभीर्याने पार पाडण्याचे आवाहन केले असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ असेल, असा स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com