Maharashtra : नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय

Maharashtra Police News : नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज! ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स सकाळी ५ वाजे पर्यंत सुरू राहणार. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि हुल्लडबाजीवर कठोर कारवाईचा इशारा.
Maharashtra : नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय
Maharashtra Police News Saam Tv
Published On
Summary
  • नववर्ष स्वागतासाठी राज्यात मोठा उत्साह

  • हॉटेल्स व बार सकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारची परवानगी

  • मुंबईत १७०००+ पोलिस, लोणावळा-खंडाळ्यात साध्या वर्दीतील पोलिस गस्त

  • ड्रंक अँड ड्राईव्ह, हुल्लडबाजीवर दंड ते वाहन जप्तीपर्यंत कठोर कारवाई

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. कोणी थंड हवेचे ठिकाण निवडले आहेत, कोणी समुद्र तर कोणी देवदर्शनाला पसंती दिली आहे. ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची झुंबड बघायला मिळते आहे. नागरिकांच्या या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पर्यटकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारकडून हॉटेल उशीरापर्यंत सुरु राहणार आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजी करणा ऱ्यांवर कारवाई होणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबरच्या रात्री ५:०० वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ऑर्केस्ट्रा बार उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स संघटनांनी रात्री उशिरापर्यंत उघडे राहण्याची परवानगी मागितली होती. या मागणीची पूर्तता महाराष्ट्र सरकारने केली आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा बीच हे सर्वात गर्दीचे ठिकाण आहेत. इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक रात्रीच्या सुमारास येतात. दरम्यान, नवीन वर्षाच्या उत्साहाच्या कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत १७,००० हून अधिक पोलिस तैनात केले जातील.

Maharashtra : नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय
Railway : रेल्वे प्रवासातील गर्दीचा ताण कमी होणार, २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार; काय म्हणाले रेल्वे मंत्री? वाचा

मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई!

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या उत्साहात तयारी करत असतानाच, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे अशा प्रकाराला कोणतीही माफी दिली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड, परवाना निलंबन, गुन्हा दाखल करणे तसेच वाहन जप्तीपर्यंत कारवाई करण्यात येईल, असेही एसपी तांबे यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी नववर्षाचे स्वागत आनंदात, पण जबाबदारीने करावे, मद्यपान केल्यास स्वतः वाहन चालवू नये, टॅक्सी, मित्र किंवा पर्यायी वाहनांचा वापर करावा आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra : नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय
Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

पर्यटनस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांनो सावधान!

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा आणि खंडाळ्यात दाखल होत असतात. मात्र, काही हुल्लडबाज पर्यटक पर्यटनाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील असे प्रकार करत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. अशा हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी लोणावळा पोलिसांनी कडक उपाययोजना राबवल्या आहेत. पर्यटन स्थळांवर सातत्याने पोलीस गस्त घातली जाणार असून, साध्या गणवेशातील पोलिसांचीही तैनाती करण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. पर्यटकांनीही प्रशासनाने दिलेल्या वेळेचे आणि नियमांचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले असून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लोणावळा परिसरात पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती लोणावळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com