8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission Implementation Date Update: आठवा वेतन आयोग लागू होण्याची कोट्यवधी कर्मचारी वाट पाहत आहेत. दरम्यान, अजूनही आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

१ जानेवारीपासून लागू होणार नवीन वेतन आयोग?

सरकारने दिली महत्त्वाची माहिती

सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेकांच्या म्हणण्यांनुसार, आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मात्र, संसदेत याबाबत चर्चा झाली.

कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? (8th Pay Commission Implementation Date)

संसदेत मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होणार की नाही हे अजूनपर्यंत ठरले नाही. यामुळे देशातील ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आठव्या वेतन आयोगाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. दरम्यान, यावर सरकारने अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत आयोग आपल्या शिफारशी १८ महिन्यात सादर करणार आहेत. यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा कोणाला मिळणार?

संसदेत चर्चेदरम्यान सांगण्यात आले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ५०.१४ लाख आहे तर पेन्शनधारकांची संख्या ६९ लाख आहे.कर्मचारी आणि पेन्शनधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारने टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली होती. यामध्ये आयोग मूळ वेतन, पेन्शन, अलाउंस आणि इतर सुविधांना लक्षात घेऊन शिफारसी तयार करतात. यानंतर आयोग फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करेल. यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

महायुतीत 'चेकमेट'चं राजकारण, 2029 साठी आत्तापासूनच शह-काटशह

SCROLL FOR NEXT