8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? सरकारनं दिली नेमकी माहिती

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर आलीय. जर आठवे वेतन आयोग लागू झाले तर देशातील एकूण ५०.१४ लाख केंद्रीय कर्मचारी काम करत आहेत, तर सुमारे ६९ लाख पेन्शनधारक आहेत, त्यांना त्याचा लाभ होणार आहे.
8th Pay Commission Update:
Central government employees await salary revision as 8th Pay Commission update is revealed in Parliament.saam tv
Published On
Summary
  • आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारची अधिकृत माहिती

  • आयोग स्थापनेनंतर १८ महिन्यांत शिफारशी सादर होणार.

  • आयोगाच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख केंद्र सरकार ठरवणार

आठव्या वेतन आयोगाबाबतनवीन माहिती समोर आलीय. देशात सध्या एकूण ५.०१४ लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. तर अंदाजे ६९ लाख निवृत्तीवेतनधारक आहेत, त्यांना आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा होईल, अशी माहिती केंद्र सरकारने सांगितलंय. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना ही माहिती दिलीय.

8th Pay Commission Update:
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 नाहीतर जमा होणार 3000 रुपये?

लोकसभेत खासदारांनी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख, संदर्भ अटी (टीओआर), अर्थसंकल्पातील निधी वाटप आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या तक्रारींवर सरकारची तयारी काय याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, आठवा वेतन आयोग त्याच्या स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत त्याच्या शिफारशी सादर करेल, तर अंमलबजावणीची तारीख सरकार ठरवेल.

8th Pay Commission Update:
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये अशी चर्चा होती, की नवीन वेतन आयोग २०२६ च्या सुरुवातीपासून लागू होईल, परंतु सरकारने या अटकळींना पूर्णविराम दिलाय. आयोगाला अधिसूचनेच्या तारखेपासून (३ नोव्हेंबर २०२५) १८ महिने लागू शकतात आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलीय.

लोकसभेत खासदार - एन.के. प्रेमचंद्रन, थांगा तमिळसेल्वन आणि धर्मेंद्र यादव यांनी सरकारसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख, संदर्भ अटी (ToR) ची स्थिती, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या समस्या येत आहेत, त्याला सरकार कसा प्रतिसाद देत आहे या प्रश्नाचा त्यात समावेश होता. तसेच आयोग अंतिम सूचना देण्यापूर्वी कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करत आहे का, असा प्रश्नही विचारण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com