Central Government Employees google
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; जुलैमध्ये DA 63% होणार? पगार वाढीचे संकेत

DA Hike 2026 Update: एप्रिल २०२६ च्या महागाई निर्देशांकानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकतो. जुलैमध्ये ३ टक्के डीए वाढ होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. पण नेमकी बेसिक सॅलरीची वाढ आणि वाढीची वेळ अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण या दिवसांमधली वाढती महागाईपाहून आठव्या वेतनाआधी कर्मचाऱ्यांना जुलै आणि महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करून दिली जाऊ शकते.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात वेतन वाढीच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या असताना, त्यांना महागाई भत्याच्या रुपात एक छोटा दिलासा मिळू शकतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, श्रम ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या नवीन महागाईच्या आकडेवारीने ही बातमी खरी होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी संघटना आठव्या वेतन आयोगासमोर मोठ्या मागण्या करत आहेत. कारण महागाईमुळे वाढणाऱ्या किमतींनी रोजचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुलभूत गरजांसाठी पैसे खर्च करणं आता जास्तच महागात पडत आहे.

औद्योगिक कामगारांसाठीची अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW), जो महागाई भत्ता (DA) ठरवण्याची महत्वाची भूमिका बजावतो, तो मार्च २०२६ मध्ये १४९.१ वरुन एप्रिल २०२६ मध्ये १४९.९ पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर किरकोळ महागाई (Retail Inflation) ही ४.२७% वरून ४.४६% पर्यंत या दिवसांमध्ये वाढवण्यात आली. या वाढीमुळे महागाई भत्त्याच्या गणनेवर थेट परिणाम होणार आहे.

एप्रिल २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या १२ महिन्यांच्या सरासरी आकडेवारीचा विचार केल्यावर DA जवळपास ६२. ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. सरकार DAची टक्केवारी पूर्णांकात जाहीर करत असल्यामुळे हा दर ६३ टक्के मानला जाऊ शकतो.

सध्या कर्मचाऱ्यांना ६० टक्के डीए मिळत असल्याने यावेळी ३ टक्क्यांची वाढ होईल अशी शक्यता आहे. पण अंतिम निर्णय मे आणि जून २०२६ च्या महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच जाहीर केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalavantin Durg : आकाशाला भिडलेला कलावंतीण दुर्ग! किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहित आहे का?

श्रावणात निरोगी राहण्यासाठी प्या हे 4 हेल्दी ड्रिंक्स; महिनाभर राहाल फिट

Fridge Foods : फ्रिजमध्ये अन्न ठेवताना 'ही' चूक करूच नका, अन्यथा बसेल मोठा फटका

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

मुंबईच्या २४ वर्षीय स्टार बायकरचा मृत्यू, १००० किमी दूर झाला भयंकर अपघात; बातमी ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT