Chanakya Niti : तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या धोकेबाज लोकांना कसं ओळखाल? चाणक्यांनी सांगितलं भयानक सत्य

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे थोर विचारवंत मानले जातात.

Chanakya Niti tips

चाणक्य निती

चाणक्यांच्या चाणक्य नितीची फायदा तुम्हाला भविष्यात यश मिळवण्यासाठी होऊ शकतो. तसेच खरं खोटं ओळखण्यास याचा फायदा होऊ शकतो.

Acharya Chanakya wisdom

माणसं ओळखा

चाणक्यांच्या मते तुम्ही माणसं ओळखायला सर्वात आधी शिकलं पाहिजे. कारण साधी माणसंच भविष्यात तुमचा घात करू शकतात.

Acharya Chanakya wisdom

तुमचा फायदा घेणारे लोक

चाणक्यांच्या मते, भविष्यात कोणती व्यक्ती तुमचा फायदा घेतेय? हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पुढील हालचालींवर लक्ष ठेवा.

How to identify fake people

गोड बोलणारे लोक

सतत तुमच्यासमोर गोड बोलणारे, पण कमी बोलणारे लोक तुमच्यामागून खूप वाईट बोलत असतात. अशांना कोणत्या महत्वाच्या गोष्टी सांगू नका.

Signs of deceitful friends

कामाला उपयोगी न पडणारे

खरा मित्र तोच असतो जो वाईट दिवसात तुमच्या पाठीशी उभा राहतो. कपटी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठीच तुमच्याकडे येतो.

Signs of deceitful friends

गुपितं सांगणे

ज्या व्यक्ती तुमच्यासमोर इतरांची गुपितं सांगतात, ते लोक तुमच्याबद्दलही लोकांना सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

Signs of deceitful friends

विश्वास ठेवणे

जे लोक सतत माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणतात, त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. ते तुमचा वापर करून घेऊ शकतात.

Signs of deceitful friends

NEXT: मुंबईजवळची Top 7 पावसाळी ठिकाणं; बजेटमध्ये करा वन डे पिकनिक प्लान

Mumbai Monsoon Picnic Spots
येथे क्लिक करा