8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरून ६८,९४० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जर फिटमेंट फॅक्टर ३.८३ झाला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही ६८,९४० रुपयांपर्यंत वाढू शकते.
8th Pay Commission salary hike
8th Pay Commission salary hikeGOOGLE
Published On

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची चांदी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ८ व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु आहेत. यातील फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ व्हावी यासाठी अनेक विभागातील कर्मचारी आणि पेन्शनधारक मागण्या करत आहेत. कारण फिटमेंट फॅक्टरवर तितका वाढतो तितकी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ होते.

जर सरकारने फिटमेंट फॅक्टर ३.८३ ठरवला तर सरकारी कर्मचाऱ्यांती बेसिक सॅलरी ही १८ हजार रुपयांवरून ६८,९४० रुपये होईल. याने सरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच होईल. तसेच वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मोठी मदतही मिळेल.

8th Pay Commission salary hike
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, 'ही' २ कामं आताच करा, अन्यथा २००० रुपयांचा हप्ता होणार बंद; पीएम किसान योजनेचे मोठे अपडेट

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ इतकी वाढ केली होती. तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही ७००० रुपयांनी वाढवून १८, ००० करण्यात आली होती. आता आठव्या वेतन आयोगाकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत.

विविध कर्मचारी संघटना आणि तज्ञांनी वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर १.९२ आहे. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने (AITUC) ३.०० फिटमेंट फॅक्टर करावा अशी मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्सने (FNPO) ३.२५ फिटमेंट फॅक्टर वाढण्याची मागणी केली आहे.

जम्मू आणि काश्मीर एम्प्लॉईज फोरमने ३.०५ फिटमेंट फॅक्टर करावा अशी मागणी केली आहे. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीनुसार (NC-JCM) फिटमेंट फॅक्टर ३.८३ वाढवावा अशी मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, अंदाजे इतका फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो. जेव्हा फिटमेंट फॅक्टमध्ये वाढ होईल तेव्हा बेसिक सॅलेरीतही वाढ होईल. याचसह तुमचा घरभाडं भत्ता, वाहतूक भत्ता आणि महागाई भत्त्यातही वाढ होईल.

8th Pay Commission salary hike
Gold Rate Today : सोनं 1.53 लाखांच्या पार, मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com