8th Pay Commission  google
बिझनेस

8th Pay Commission: पगार, DA, HRA आणि पेन्शनवर होणार मोठा परिणाम, पाहा 2.1, 2.5 आणि 3.0 फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित

8th Fitment Factor : आठव्या वेतन आयोगात 2.1, 2.5 आणि 3.0 फिटमेंट फॅक्टरमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते. DA, HRA, पेन्शनवरील परिणाम आणि संपूर्ण वेतन गणित जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत आनंदाची बातमी आहे. १० जुलै रोजी कोलकातामध्ये झालेल्या आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत कर्मचारी संघटना, अनेक यूनियन आणि संबंधित पक्षांनी आयोगासमोर त्यांची मतं, मागण्या आणि अडचणी मांडल्या. पुढच्या दिवसांमध्ये आयोग देशातल्या इतर शहरांमध्येही अशाच बैठका घेणार आहे. त्यानंतर वेतन, भत्ता, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरबद्दल केंद्र सरकारला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.

वेतनातला किंवा बेसिक सॅलरी ठरवण्यासाठी महत्त्वाचा असणारा फिटमेंट फॅक्टर बद्दलही सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. कमर्चाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत किती वाढ होणार हे मोठ्या प्रमाणात या फॅक्टरवर अवलंबवून असतं. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक सॅलरीतला लावला जाणारा गुणांक असतो. यात तो जितका दास्त असतो, तितकी तुमच्या बेसिक सॅलरीत वाढ होते.

सध्या केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी कोणता फिटमेंट लागू करणार याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे 2.1, 2.5 आणि 3.0 हे आकडे फक्त संभाव्य उदाहरणं म्हणून पाहिली जातात.

तसेच आर्थिक तज्ज्ञांच्या मते, लेव्हल 1 मधल्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे 18,000 रुपये बेसिक सॅलरी 2.1 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर 37,800 रुपये होऊ शकते. 2.5 फिटमेंट फॅक्टर असेल तर ते 45,000 रुपये, तर 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर 54,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे लेव्हल 10 मधल्या कर्मचाऱ्यांची सध्या 56,100 रुपये बेसिक सॅलरी 2.1 फिटमेंट फॅक्टरनुसार 1.18 लाख रुपये, 2.5 फॅक्टरनुसार 1.40 लाख रुपये आणि 3.0 फॅक्टरनुसार जवळपास 1.68 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्षाबंधनाला खरेदीची गोल्डन संधी; सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत 22K, 24K चा आजचा भाव किती?

Maharashtra News Live Update: सोलापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार

Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेश मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’, ११ अटी पूर्ण केल्यावरच मिळणार जोडणी

आश्रमशाळेत संतापजनक प्रकार! २१ मुलींचा विनयभंग; दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Chocklate For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी चॉकलेट खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा चॉकलेट ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT