Good News Before Raksha Bandhan: DA Hike Expected in August Saam TV News Marathi
बिझनेस

DA Hike : रक्षाबंधनाआधी गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

DA Hike Update : रक्षाबंधनपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३-४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करू शकते.

Namdeo Kumbhar

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

  • ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ जाहीर होऊ शकते.

  • सातव्या वेतन आयोगांतर्गत वाढ लागू केली जाणार

  • AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे भत्त्याची गणना केली जाते

DA increase likely by 4% before August 2025 salary : लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये दोन टक्के डीए (महागाई भत्ता) वाढवण्यात आला होता. त्यामुळे महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढला. आता यामध्ये आणखी तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातमोठी वाढ होऊ शकते.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा करण्यात येईल. पण त्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळू शकते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकार डीए वाढीची घोषणा करू शकते.

वर्षामधून दोन वेळा घोषणा -

महागाई लक्षात घेऊन सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. एक जानेवारी आणि १ जुलै या तारखेपासून महागाई भत्ता लागू होतो. मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 1 जानेवारीपासून लागू मानला गेला आहे. आता होणारी घोषणा 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या पेन्शनवर लागू होते.

महागाई भत्ता कसा ठरतो?

अखिल भारतीय औद्योगिक कामगार उपभोक्ता मूल्य निर्देशांक (AICPI-IW) च्या आधारावर कामगारांसाठी महागाई भत्त्याची गणना केली जाते. AICPI-IW निर्देशांक देशातील 88 औद्योगिक केंद्रांमधील 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किंमतींच्या आधारावर जाहीर केला जातो. डीएमध्ये सुधारणा करण्यापूर्वी सरकारकडून मागील सहा महिन्यांचा डेटा तपासते.

महागाई भत्त्यासंदर्भातील तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे dearness allowance questions and answers in marathi

रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे?

महागाई भत्त्यात (डीए) ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

महागाई भत्ता किती वेळा घोषित केला जातो आणि तो कधी लागू होतो?

वर्षातून दोनदा, १ जानेवारी आणि १ जुलै पासून महागाई भत्ता लागू होतो.

यावेळी डीए वाढीची घोषणा कधी होण्याची शक्यता आहे?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

डीए वाढीचा फायदा कोणाला होतो?

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना (पेन्शनधारक) डीए व डीआरचा फायदा मिळतो.

महागाई भत्ता कोणत्या आधारावर ठरवला जातो?

अखिल भारतीय औद्योगिक कामगार उपभोक्ता मूल्य निर्देशांक (AICPI-IW) च्या आधारावर डीए ठरवला जातो.

AICPI-IW निर्देशांक कशावर आधारित आहे?

देशातील ८८ औद्योगिक केंद्रांमधील ३१७ बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किंमतींच्या डेटावर आधारित आहे.

डीए आणि डीआर यात काय फरक आहे?

डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, तर डीआर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी लागू होते.

यापूर्वी डीए किती टक्के वाढला होता आणि तो कधी लागू झाला?

मार्चमध्ये डीए २ टक्क्यांनी वाढला आणि तो १ जानेवारी २०२५ पासून लागू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : जळगावमध्ये जोरदार राडा; दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण

Pimpri : पिंपरीत वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती, आणखी एक हुंडाबळी | VIDEO

Shravan Name Meaning: श्रावण महिन्याचे नाव 'श्रावण' का पडले? जाणून घ्या जुना इतिहास

Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

SCROLL FOR NEXT