पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळला, नवऱ्याने पेटवून घेतलं, नांदेडमधील धक्कादायक घटना

नांदेडमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
nanded Crime
HUSBAND COMMITS SUICIDE IN NANDED OVER WIFE'S AFFAIR, POLICE ARRESTS TWOSaam TV News Marathi
Published On
Summary
  • पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून नवऱ्यानी आत्महत्या केली.

  • अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले

  • पोलिसांनी पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर शंकर यांना अटक केली.

  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला

संजय सुर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आनंदा जाधव असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आनंदाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथी ही धक्कादायक घटना घडली.

कुंडलवाडी पोलिसांकडून पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आनंदा याच्या आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना अर्जापूर (ता. बिलोली) येथे रविवारी (ता.२०) रात्री अकराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पंचमाना करत पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांकडून तपास कऱण्यात येत आहे. आतापर्यंत दोघांना बेड्या ठोकल्या आल्या आहेत.

nanded Crime
Crime : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, संपर्क कार्यालयात लचके तोडले

आनंद हणमंतराव जाधव (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून, पत्नी राजश्री आनंदा जाधव (वय ३३) आणि तिचा प्रियकर शंकर लिंगप्पा पांचाळ (वय ५२, रा. अर्जापूर) या दोघांवर कुंडलवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, अर्जापूर येथील आनंदा जाधवने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून राहत्या घरी रविवारी रात्री अंगावर ज्वलनशील पदार्थ घेतले. अंगावर ओतून पेटवून यात ते गंभीररित्या भाजले. त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली पत्नी आणि तिच्या प्रियकराला कुंडलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर करीत आहेत.

nanded Crime
Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली
Q

विवाहबाह्य संबंधांचा वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होतो?

A

विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवनात तणाव, विश्वासघात आणि मानसिक आघात होऊ शकतो. आनंदा जाधव यांच्या बाबतीत आत्महत्येपर्यंत परिस्थिती गेली.

Q

विवाहबाह्य संबंधांसाठी कायदेशीर कारवाई काय होऊ शकते?

A

आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा मानसिक छळ केल्यास, पोलिस गुन्हा दाखल करू शकतात आणि अटक होऊ शकते. पण विवाहबाह्य संबंध असल्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही. कोर्टात विभक्त होण्यासाठी अर्ज केला जातो.

Q

विवाहबाह्य संबंधामुळे उद्भवलेल्या घटनेचा तपास कसा केला जातो?

A

पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करतात, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवतात आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जातो.

Q

विवाहबाह्य संबंधांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

A

विवाहबाह्य संबंधाामुळे तीव्र मानसिक तणाव, नैराश्य आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात.

Q

अशा घटनांमध्ये पोलिसांची भूमिका काय असते?

A

पोलिस तात्काळ कारवाई करतात, संशयितांना अटक करतात आणि तपास करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com