
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार कोटींच्या कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली.
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे आहे.
पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, मृदा आरोग्य आणि पिक विविधीकरणाचा समावेश
वादग्रस्त विधानांवर कोकाटे यांनी दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली
Manikrao Kokate Press Conference : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषीमंत्रालयाने कृषी समृद्धी योजनेचे लाँचिंग करण्यात येत असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. विधिमंडळात गेम खेळतानाचा व्हिडिओ आणि शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच माणिकराव कोकाटे यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. तब्बल ५ हजार कोटी रूपयांच्या योजनेचा आज जीआर निघाल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी समृद्धी योजनेची माहिती दिल्यानंतर आपल्यावरील आरोपाचे प्रत्युत्तरही दिले. राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याशिवाय दोषी आढळलो तर राजीनामा द्यायला तयार आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले.
फडणवीस-दादांच्या वाढदिवसाला नव्या योजनेची घोषणा, कुणाला होणार फायदा ?
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ५ हजार कोटी रूपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भातील निर्णायाला कॅबिनेटने आधीच मान्यता दिली आहे. त्याचा जीआर आज निघाला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणं. उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणे, पिक विविधिकरण करणं, मूल्य साखळी बळकट करणं, तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा उद्देश आहे. हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन, जमीन संसाधन विकास, हवामान अनुकूल बहु पिक पद्धतीचा वापर, मूल्य साखळी विकास, काढणी पाश्चात पायाभूत सूविधा, संस्थात्मक बळकटी, ज्ञान, संशोधन, क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकार रासायनिक खतांसाठी एक लाख ९० हजार कोटींची सबसिडी देते, त्याधर्तीवर दरवर्षी सात टक्के रासायनिक खतांमध्ये वाढ होते. राज्य सरकार नैसर्गिक शेती करण्याचा आग्रह धरत अशताना दुसरीकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमणात होत असल्यामुळे नैसर्गिक शेतीची औषधं आणि बी-बियाणांसाठी अनुदान सुरू केले आहे. नैसर्गिक शेतीसाठी अनुदान दिले जाणार नाही, तोपर्यंत शेती वाढणार आहे. नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी अनुदान दिला जाईल. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे कोकाटे म्हणाले.
कृषी समृद्धी योजनेची घोषणा कोणत्या निमित्ताने करण्यात आली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लाँच करण्यात आली आहे.
कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे.
कृषी समृद्धी योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, मृदा आरोग्य, पिक विविधीकरण, मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात सुविधा.
नैसर्गिक शेतीसाठी सरकार काय करत आहे?
नैसर्गिक शेतीसाठी औषधे आणि बियाणांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी किती निधी ठेवण्यात आला आहे?
५ हजार कोटी रुपये.
आरोपांवर माणिकराव कोकाटे यांनी काय सांगितले?
ऑनलाइन गेम खेळताना व्हिडिओ आणि मी दोषी आढळल्यास राजीनामा देण्यास तयार असल्याचे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.