7th Pay Commission Saam Tv
बिझनेस

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! DA मध्ये होणार वाढ? जाणून घ्या किती होणार पगार

कोमल दामुद्रे

DA Hikes :

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीसाठी सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. यावेळी डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. अशावेळी आता पर्यंत मिळालेल्या महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरुन ४५ टक्के होईल. असे झाल्यास साधरणत: एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होऊ शकतो.

1. सध्या 42% महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकार (Government) वर्षातून दोनदा वाढ करते. DA ची पहिली वाढ २४ मार्च २०२३ रोजी करण्यात आली होती त्याचा वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (Pension) जानेवारी महिन्यापासून सुरु होईल. त्यानंतर सरकारने डीएमध्ये चार टक्के वाढ केली, ज्यामुळे तो 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला. आताही त्यात ४ टक्के वाढ करण्याची मागणी होत असली तरी सरकार डीए ३ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या रिपोर्टमध्ये, ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले होते की, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची मागणी आहे.

2. डीएचा भत्ता कसा वाढला जातो?

सध्या केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही घोषणा किंवा टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र सीपीआय-आयडब्ल्यूच्या आकडेवारीवर पाहता अशी आशा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात करण्याचा निर्णय कामगार ब्युरोने जारी केलेल्या अद्यतनित CPI-IW च्या आधारे केंद्र सरकारने घेतला आहे. याची आकडेवारी पाहिली तर, जुलै 2023 मध्ये, CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास, यात सुमारे 0.90 टक्के वाढ दिसून येते.

3. महागाई भत्त्यात सरकारने दोनदा बदल केले

केंद्र सरकारने दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए तीन टक्क्यांनी वाढवून 45 टक्के करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे फायदे 1 जुलै 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होतील. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) मोठी वाढ होऊ शकते. चलनवाढीचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे.

केंद्र सरकार दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करते. वर्ष 2006 मध्ये, केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी डीए आणि डीआरच्या भत्त्यासाठी नवीन नियमावली आखण्यात आली. यामध्ये सर्वाधिक लक्ष महागाई दरावर आहे. दुसऱ्या सहामाहीत महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 69.76 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

4. पगारवाढ कसा होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के डीए वाढीची भेट मिळू शकते आणि महागाई भत्ता ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. यानुसार पगारवाढीचा हिशोब केला जाईल. समजा, कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये आहे. त्यामुळे आत्तापर्यंत यावर ४२ टक्के डीए नुसार ७,५६० रुपये होतात. पण 45 टक्के बघितले तर ते 8,100 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच महिन्याला मिळणारा पगार थेट ५४० रुपयांनी वाढणार आहे. दुसरीकडे, जर आपण एखाद्या कर्मचाऱ्याचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये पाहिले, तर आत्तापर्यंत त्यावरचा डीए 23,898 रुपये आहे, तर तीन टक्क्यांच्या वाढीनंतर तो 25,605 रुपये होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT