Atal Pension Yojana saam tv
बिझनेस

Atal Pension Yojana: तुम्हालाही मिळू शकते दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या 'अटल पेन्शन योजने'चे फायदे

Central Government Schemes: तुम्हालाही मिळू शकते दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या 'अटल पेन्शन योजने'चे फायदे

Satish Kengar

Atal Pension Yojana: प्रत्येकाची इच्छा असते की त्याने गुंतवणूक करावी, जेणेकरून त्याचे भविष्य सुरक्षित होईल. यासाठी लोक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यातच लोक गुंतवणुकीसाठी असा पर्याय निवडतात जिथे ते त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षितपणे गुंतवू शकतात आणि नंतर त्यांना चांगले परतावा मिळू शकतो.

अशा अनेक सरकारी योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. अशीच एक योजना आहे 'अटल पेन्शन योजना'. ही योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेंतर्गत तुम्हाला दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. त्यामुळेच सध्या या योजनेशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल आणि त्याअंतर्गत मिळणारे फायदे कोणते आहेत... (Utility News in Marathi)

काय आहे ही योजना?

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत तुम्हाला आधी यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला दरमहा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. (Latest Marathi News)

या योजनेत दरमहा 210 रुपये गुंतवले तर तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर वार्षिक 60 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. त्यानुसार तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते.

कोण करू शकतो अर्ज?

  • जो भारताचा नागरिक आहे, तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

  • ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे.

  • त्यांचे बँक खाते आधारशी लिंक असावे.

  • अशी व्यक्ती जी आधीच या योजनेचा लाभ घेत नाही.

कसा करावा अर्ज?

आधी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html आणि येथे दिलेल्या 'APY Application' वर क्लिक करा. आता तुमची आधार माहिती एंटर करा, याशिवाय तुम्हाला मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्याची माहिती टाकावी लागेल.

त्यानंतर तुमचे बँक खाते सक्रिय केले जाईल आणि नंतर प्रीमियम आणि नॉमिनीचे तपशील द्या. शेवटी ई-साइन करा आणि पडताळणीनंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia : राजकारणात खळबळ, महायुतीच्या मंत्र्याने दिला पालकमंत्रीपदाचा राजीनामा, कारण आले समोर | VIDEO

Disha Patani Hot Photos: हॉटनेसचा कहर! अभिनेत्री दिशाला पाहून भल्याभल्याना फुटला घाम

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप

Voter List : अजब कारभार चव्हाट्यावर! नाव, पत्ता नव्हे अनेक गावं मतदार यादीतून गायब, अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT