Layoffs 2024  Saam Tv
बिझनेस

Layoff News: टेक इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण! एका महिन्यात 32,000 कर्मचाऱ्यांच्या गेल्या नोकऱ्या

Tech Industry Layoff News: टेक इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष भीतीदायक ठरताना दिसत आहे. या वर्षी आतापर्यंत सुमारे 32,000 टेक कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Tech Industry Layoff News:

टेक इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष भीतीदायक ठरताना दिसत आहे. या वर्षी आतापर्यंत सुमारे 32,000 टेक कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. कमर्चारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये Amazon, Salesforce Inc आणि Meta Inc सारख्या ई-कॉमर्स दिग्गजांचा समावेश आहे.

टेक कंपनींवर लक्ष ठेवणाऱ्या Layoffs.fyi ने सांगितलं की, आतापर्यंत 122 हून अधिक टेक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी सुमारे 32 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असून हा ट्रेंड अजूनही सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2 वर्षात 4 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या

जगभरातील स्टार्टअपसह टेक कंपन्यांनी 2022 आणि 2023 मध्ये 4,25,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. तसेच याच कालावधीत भारतात 36,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.  (Latest Marathi News)

कोणत्या कंपनीत किती कर्मचाऱ्यांची झाली कपात

जानेवारी महिन्यात 120 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यात काही मोठ्या कंपन्यांचा समावेश देखील आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे स्नॅप इंक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येपैकी 10 टक्के कर्मचारी म्हणजेच 540 लोकांना कामावरून काढलं आहे. तसेच झूम सुमारे 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. झूम व्यतिरिक्त, क्लाउड सॉफ्टवेअर विक्रेता ओक्ता ने 400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचं सांगितलं आहे.

ऑनलाइन पेमेंट गेटवे पेपलने सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. यातच Google च्या मालकीचे YouTube ने निर्माते व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून किमान 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. त्याचप्रमाणे VEM सॉफ्टवेअरने 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.

रोबोट कंपनीतही कर्मचारी कपात

दरम्यान, iRobot ने सुमारे 350 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कॉलिन एंगल हे देखील आपलं पद सोडणार आहेत. याशिवाय सेल्सफोर्सनेही सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कमावून काढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT