Jayant Patil: '..तर निव्वळ योगायोग समजावा' NCP नेते जयंत पाटील यांच्या ट्विटची तुफान चर्चा, नेटकरीही म्हणाले; 'आरारा खतरनाक...'

या जबरदस्त मीममधून जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
 जयंत पाटील
जयंत पाटील Saamtv

Jayant Patil: राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचे नेते नेहमीच त्यांंच्यावर टीका करत असण्याची संधी शोधत असतात. त्याचबरोबर राज्यातील मोठे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्यानेही त्यांच्यावर टीका होत असते. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ट्विटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे - आणि देवेंद्र फडणवीसांना सणसणीट टोला लगावला आहे. (Jayant Patil)

 जयंत पाटील
Shree Ram Temple : श्रीराम मंदिरात चाेरी; चांदीच्या पादुकांसह दानपेटीवर डल्ला

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या राजकीय टोलेबाजीची नेहमीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचे असेच एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये ब्लिंकीट आणि झोमॅटो या दोन डिलिव्हरी कंपनीच्या जाहीराती दिसत आहेत. ज्यामध्ये एका कंपनीने "दुध मांगोगे तो दुध देंगे असे लिहले आहे तर त्याच शेजारी झोमॅटो कंपनीने खीर मांगोगे तो खीर देंगे" असे लिहले आहे.

या दोन्ही जाहिरातींच्या मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde)- आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो असलेले एक हॉर्डिंगही दिसत आहे. यावर" इंनवेसमेंट मांगोगे युपी बिहार को देंगे," असे लिहलेले दिसत आहे. या जाहिरातीमधून शिंदे फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

 जयंत पाटील
Vinayak Raut : 'राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात'; खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

त्याचबरोबर हे ट्विट करत जयंत पाटील यांनी "फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा," असा कॅप्शनही दिला आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनीही त्यांच्या या ट्विटवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com