Union Budget 2025 Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2025: अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री!

Tax Free Income Upto 12 Lakh: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सितारामन यांनी १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारणार नसल्याचे सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रातील मोदी सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली आहे. नोकरदार वर्गाला मोठं गिफ्ट देतानाच, १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. याचाच अर्थ १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला ८ वा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. नोकरदारवर्गाला मोठी भेट देतानाच अर्थमंत्री सीतारामन यांनी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे.

Income tax

नव्या करप्रणालीत मोठे बदल

१२ लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेय. त्यामुळे १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ८० हजार रूपयांचा सरळ फायदा होणार आहे. पुढच्या आठवड्यात हे नवीन विधेयक आणण्यात येणार आहे. त्यामुळे नेमकं १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त कसं होणार हे पुढच्या आठवड्यात समजणार आहे.

स्वतः च्या घरांवरदेखील टॅक्सपासून दिलासा मिळाला आहे. टॅक्स फाइल करण्याची मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुढच्या आठवड्यात नवीन टॅक्स बिल सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन कर प्राणी लागू करण्यात येईल.

सध्या टीडीएसवरील लिमिट २.४ लाखांची वाढवून ६ लाख करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही टॅक्सपासून दिलासा मिळाला आहे. तसेच TCS भरायला जास्तवेळ लावल्यावर तुमच्यावर कारवाई होणार नसल्याचेही निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT