अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसद भवनात आठवा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. यात विकासाला गती देणे, सुरक्षित समावेशक वाढ, खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, घरगुती खर्चात वाढ, भारतातील उदयोन्मुख मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवणे या ५ गोष्टींवर सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचं सीतारामन यांनी भाषण करताना म्हटलं आहे.
दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आणि अभियान राबवले जाणार आहेत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, मत्स्यपालनाचा भारत हा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश असून ६० हजार कोटी रुपयांचा बाजार आहे. त्यामुळे अंदमान, निकोबार आणि खोल समुद्रात मासेमारीला प्रोत्साहन देईल. राष्ट्रीय उच्च उत्पन्न बियाणे अभियान राबवले जाईल. राष्ट्रीय उच्च उत्पन्न बियाणे अभियान चालवले जाणार आहे. संशोधनामुळे १०० हून अधिक उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्या उपलब्ध होतील. कापसाचे उत्पादन वाढवण्याचे ५ वर्षांचे ध्येय असून कापसाच्या लांब स्टेपल जातींना प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत, उत्पादकतेत लक्षणीय वाढ होईल तसंच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशाचा वस्त्रोद्योग बळकट होईल.
येणाऱ्या पाच वर्षात मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.