Government Housing Scheme Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Budget 2025: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, २०२५ मध्ये ४०००० घरं बांधणार

government housing scheme: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

Priya More

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. २०२५ मध्ये तब्बल ४० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे यावर्षामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय काय मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशामध्ये निर्मला सितारामन यांनी घरांबाबत मोठी घोषणा केली.

२०२५ मध्ये म्हणजे या वर्षामध्ये आणखी ४० हजार नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकार ४० हजार घरं बांधणार असून परवडणाऱ्या किंमतीमध्ये सर्वसामान्यांना ही घरं खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना यावर्षामध्ये हक्काचे घर मिळणार आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा लागोपाठ आठवा अर्थसंकल्प आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दोन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT