'त्या' फायर ऑडिटवर अंमलबजावणी झाली असती तर... Saam Tv
ब्लॉग

'त्या' फायर ऑडिटवर अंमलबजावणी झाली असती तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमित आवारी

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे Corona Patients प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात ICU 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 13 जणांचा आज मृत्यू Deaths झाला. ही आग शॉकसर्केटमुळे Short Circuit लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. या कोविड अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झाले होते. त्यातील त्रुटीही जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आल्या होत्या मात्र त्यानुसार अंमलबजावणी मात्र झाली नाही.

कोरोना महामारीची साथ सुरू झाल्यावर जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत कोरोना उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी तेथे अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पाहून या इमारतीच्या समोर ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयाचे 2015 व 2021 या वर्षांत फायर ऑडिट करण्यात आले होते. हे फायर ऑडिट महापालिकेतील अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी केले होते. नवीन इमारतीतील अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट 2021मध्ये करण्यात आले होते. यात मिसाळ पाच ते सहा त्रुटी जिल्हा रुग्णालयाला कळविल्या होत्या. यात फायर अलाराम, स्प्रिकंलर, पाण्याचे पंप, सेंसर आदी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे सांगत त्या त्वरीत बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र आज तागायत या त्रुटी पूर्ण केल्या गेल्या नाहीत.

विद्युत अतिदाब;

कोविड अतिदक्षता विभागात विद्युत तारांचा संच होता. या संचात शॉकसर्केट होऊन अपघात झाला असावा. शॉकसर्केट झाल्यावर या विभागातील ऑक्सिजन पाईपने आग पकडली असावी. हा आगीचा भडका रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने आग अटोक्यास येण्यास अडचण आली. यातच पीओपीमुळेही धुर वाढला, असा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT