अमित आवारी
अहमदनगर : कोरोना रुग्णांचे Covid Patients In Ahmednagar प्रमाण अहमदनगर शहरात वेगात घटत आहे. सध्या अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील Covid ICU अतिदक्षता विभागात १७ कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज मृत्यू झाला आहे. आगीबद्दल अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. तर आगीमुळे मरण पावलेले हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.
व्हिडीओ-
काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही वाहनाला अचानक आग लागली होती. या बाबत चौकशी सुरू असतानाच, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयात आगीचे, धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
जिल्हा रुग्णालयात आग लागलेली माहिती मिळताच, महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक Fire brigade त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली होती, तसेच धुराचे लोटही उठले होते. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असल्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या 10 कोरोना रुग्णांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना स्थळाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले Rajendra Bhosale व आमदार संग्राम जगताप MLA Sangram Jagtap यांनी भेट दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पत्रकारांना घटनेची माहिती दिली आणि जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोविडचे १७ रुग्ण होते. त्याच वॉर्डला सकाळी अचानक आग लागली आहे. त्यात १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून एक रुग्णाची स्थिती गंभीर आहे. त्या सर्व रुग्णांच्या मृत्यूची कारण शवविच्छेदनानंतरच कळतील. या विभागाच्या बिलिंग व फायर ऑडिट Fire Audit Of Hospital संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक दृष्ट्या शॉकसर्केटमुळे आग लागल्याचे महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
त्यांनी पुढे माहिती दिली, या अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झालेले होते. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार चौकशी केली जाईल. तसेच मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत दिली जाणार. या संदर्भात माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. या घटनेमुळे अतिदक्षता विभागातील १ रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये तर इतर रुग्ण जिल्हा रुग्णालयातील इतर विभागांत हलविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली.
ही आहेत मृतांची नावे;
रामकिसन विठ्ठल हरपुडे ( वय 70)
सिताराम दगडू जाधव (वय 83)
सत्यभामा शिवाजी घोडचौरे (वय 65)
कडूबाई गंगाधर खाटिक (वय 65)
शिवाजी सदाशिव पवार (वय 82)
दीपक विश्वनाथ जेडगुले (वय 57)
कोंडाबाई मधुकर कदम (वय 70)
आसराबाई नांगरे (वय 58)
छबाबी अहमद सय्यद (वय 65)
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.