yellow watermelon in vashi apmc navi mumbai
yellow watermelon in vashi apmc navi mumbai saam tv
ऍग्रो वन

APMC Market Vashi : एपीएमसीत मुंबईकरांची पिवळ्या कलिंगडास पसंती, आवक वाढली

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai :

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात (Agriculture Produce Market Committee) आता पिवळया कलिंगडाची (yellow watermelon) आवक वाढली आहे. पिवळे कलिंगड आरोग्याला पोषक असल्याचे व्यापारी सांगतात. हे कलिंगड चवीला गोड आहेत. पिवळ्या कलिंगडाची आवक केवळ तीन महिनेच राहणार आहे. याला ग्राहकांची मोठी पसंती मिळू लागली आहे. दरम्यान लाल कलिंगडपेक्षा पिवळ्या कलिंगडचे दर एपीएमसी बाजारात दुप्पट असल्याचे चित्र आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एपीएमसी फळ बाजारात लाल कलिंगडाची माेठी आवक झाली हाेती. महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यातून देखील कलिंगडाची मोठी आवक झाली होती. आता पिवळे कलिंगड देखील बाजारात माेठ्या प्रमाणात येत आहे. (Maharashtra News)

लाल कलिंगडाची किंमत 16 ते 18 रुपये किलो इतके आहे. याच एपीएमसी बाजारात पिवळे कलिंगड 30 ते 32 रुपये प्रति किलो इतक्या रुपयांना विकले जात आहे. त्याचा दर लाल कलिंगड पेक्षा दुप्पट आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथून या पिवळ्या कलिंगडाची आवक होत आहे. याची चव चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT