BJP Candidate : उदयनराजेंनी सबुरीने घेतले पाहिजे हाेते : नरेंद्र पाटील (Video)

Narendra Patil : अण्णासाहेब पाटील यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त माथाडी भवन येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील बाेलत हाेते.
mathadi leader narendra patil commnet on udayanraje bhosale satara lok sabha constituency
mathadi leader narendra patil commnet on udayanraje bhosale satara lok sabha constituencysaam tv

- सिद्धेश म्हात्रे

Satara Lok Sabha Constitunecy :

सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या (satara lok sabha constituency) उमेदवारीबाबत महायुतीत निर्माण झालेला पेचात भाजप नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी सबुरी घेण्याचे गरजे हाेते असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (mathadi leader narendra patil) यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले. दिल्लीत छत्रपतींना भाजप नेते वेळ देत नाहीत याचे मला देखील वाईट वाटत आहे असेही पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

अण्णासाहेब पाटील यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त माथाडी भवन येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या खासदार उदयनराजे भाेसले यांना दिल्लीत 3 दिवस तळ ठाेकावा लागल्याचे म्हटले.

mathadi leader narendra patil commnet on udayanraje bhosale satara lok sabha constituency
Ahmednagar Lok Sabha Constituency : 'आगे आगे देखो होता है क्या', राणी लंके यांचे सूचक वक्तव्य (Video)

नरेंद्र पाटील म्हणाले उदयनराजेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांना भेट मिळत नसल्याने आम्हालाही वाईट वाटत आहे. एकीकडे आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो दुसऱ्या बाजूला ते राज्यसभेचे सदस्य आहेत असे असताना भेट मिळत नसेल तर उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान निर्णय माझ्या बाजूने लागू दे अथवा त्यांच्या बाजूने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारचे योगदान देण्यामध्ये आम्ही दोघेही संयुक्तपणे काम करू असे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mathadi leader narendra patil commnet on udayanraje bhosale satara lok sabha constituency
Wardha Lok Sabha 2024 : ध्यानीमनी नसताना दुस-या पक्षात लढावं लागत आहे, इंडिया आघाडीला बळकट करु या : अमर काळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com