Ahmednagar Lok Sabha Constituency : 'आगे आगे देखो होता है क्या', राणी लंके यांचे सूचक वक्तव्य (Video)

Rani Nilesh Lanke : राणी लंके या देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेत मिसळत आहेत. साम टीव्हीशी गप्पा मारता मारता लंके यांनी मी किंवा निलेश लंके यापैकी एक जण नक्कीच उमेदवार असू असे सूचक वक्तव्य केले.
rani nilesh lanke wish to contest from ahmednagar lok sabha constituency
rani nilesh lanke wish to contest from ahmednagar lok sabha constituencysaam tv
Published On

- सुशिल थाेरात

Ahmednagar Lok Sabha Constituency :

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. भाजपने दुसऱ्यांदा सुजय विखे पाटील (bjp mp sujay vikhe patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) उमेदवाराच्या अद्याप घाेषणा झाली नसली तरी या मतदरासंघात तुतारी नक्कीच वाजणार असा आत्मविश्वास आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके (rani nilesh lanke) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके (rani lanke) या दाेघांची नावं चर्चेत आहेत. लंके यांनी निवडणुकीची तयारी देखील केली आहे. परंतु सद्यस्थितीत ते आमदार असल्याने त्याबाबत तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून लंक त्यांची पत्नी राणी यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

rani nilesh lanke wish to contest from ahmednagar lok sabha constituency
Shirdi Crime News : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार, हॉटेल परिसरात खळबळ; पाेलिस तपास सुरु

राणी लंके या देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेत मिसळत आहेत. साम टीव्हीशी गप्पा मारता मारता राणी लंके यांनी मी किंवा निलेश लंके यापैकी एक जण नक्कीच उमेदवार असू असे सूचक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या आमच्या दोघांपैकी एक जण लोकसभेची निवडणूक लढविणार असून नक्कीच मतदारसंघात तुतारी वाजेल.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आगे आगे देखो होता है क्या...

त्या म्हणाल्या लोकांमधून मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या दोघांपैकी एक जण लढा अशी भावना लाेक व्यक्त करीत आहेत. आम्ही देखील उत्साही आहाेत. लवकरच आमचा निर्णय होईल तसं वरिष्ठांशी बोलणं चालू आहे. आगे आगे देखो होता है क्या असे सुचक वक्तव्य ही राणी लंके यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

rani nilesh lanke wish to contest from ahmednagar lok sabha constituency
अरविंद केजरीवाल दिल्लीचा कारभार चालवू शकतील? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, अटक बेकायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com