Shirdi Crime News : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार, हॉटेल परिसरात खळबळ; पाेलिस तपास सुरु

Shirdi : या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.
shirdi police is investigating firing incident
shirdi police is investigating firing incidentsaam tv

- सचिन बनसाेडे

Shirdi :

शिर्डी शहरात आज (गुरुवार) काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन गोळ्या झाडल्या. शिर्डी पाेलिस (shirdi police) घटनास्थळी पाेहचले असून घटनेचा तपास सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिर्डी शहरातील एका खासगी पार्किंगमध्ये आज दुपारच्या सुमारास गाेळीबाराची घटना घडली. संशयिताने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गाेळी हॉटेलच्या खाेलीत घुसली. या घटनेनंतर संशयितांना घटनास्थळावरुन धूम ठाेकली. या घटनेनंतर संबंधित हाॅटेल परिसरात आणि शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली.

shirdi police is investigating firing incident
Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. नेमका गोळीबार कुणी आणि का केला याबाबत तपास सूरू असल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

shirdi police is investigating firing incident
Lok Sabha Election 2024 : पैलवान ते छत्रपतींची गादी! सातारा लोकसभा मतदारसंघ यंदा कोण गाजवणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com