Tomato, nashik news, pimpalgaon apmc market saam tv
ऍग्रो वन

Tomato Price Drop In Nashik : टाेमॅटाेच्या काेसळत्या दरामुळे शेतकरी व्यथित, बाजार समितीच्या आवारात व्यापा-यांवर टीका

pimpalgaon apmc market : सरकारची भीक तर आम्हांला नकाेच असेही शेतक-याने म्हटलं.

अभिजीत सोनावणे

Nashik News : पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. टोमॅटोला प्रति 20 किलो कॅरेट अवघे 100 ते 250 रुपयांचा भाव मिळू लागल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात टोमॅटो फेकले. लाखो रुपये उत्पादन खर्च करूनही साधी मजुरी देखील सुटत नाही असे म्हणत शेतक-यांनी देखील सरकारवर टीका केली. (Maharashtra News)

दुष्काळी स्थिती

दरम्यान साम टीव्हीशी बाेलताना शेतक-यांना आम्ही आर्थिक संकटात सापडल्याचे नमूद केले. एका शेतक-याने टाेमॅटाेला 20 किलाेच्या क्रेटला 100 ते 150 रुपये दर मिळू लागला आहे. कठीण परिस्थिती आली आहे आमच्यावर असे सांगितले. ताे म्हणाला तळ्यातले पाणी संपले, विहिरीचे पाणी संपले, काय करायचे शेतक-याने सांगा.

...त्यावेळी व्यापारी आमच्या मागे पळत हाेते

लाईट क्लिअर नाही. पाऊस नाही, काय करायचे शेतक-याने आत्महत्या करायची का असा सवाल शेतक-याने उपस्थित केला. भाव वाढला तेव्हा व्यापारी आमच्या मागे पळत हाेते आता काेणी आम्हांला जवळ करत नाहीये. तुम्हीच सांगा काेठे जायचे शेतक-यांनी असा सवाल शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.

5 लाखाचं कर्ज डाेक्यावर

दूस-या एका शेतक-याने व्यथा सांगताना सरकारवर ताशेरे मारले. ते म्हणाले 5 लाख रुपये कर्ज काढले. टाेमॅटाे पिकवली. ही टाेमॅटाे निर्यात करण्याच्या दर्जाची आहे. या मालाला 100 रुपये दर मिळताेय. काय करायचे सांगा, कसं कर्ज फेडणार आम्ही. सरकारची भीक तर आम्हांला नकाेच असेही शेतक-याने म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News: आईनेच मुलाला झोपडीत बांधून ठेवलं, पाहा VIDEO

शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; आमदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ | VIDEO

Maharashtra Politics : बीडचं राजकारण फिरलं; मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं,VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली नांदणी जैन मठाला भेट

मतांची नाही, डोक्यातली 'चीप' चोरीला गेलीये; CM फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार|VIDEO

SCROLL FOR NEXT