Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim News : बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक; वाशीम जिल्ह्यात उत्पदनातही वाढ

washim News : यंदाच्या खरीप हंगामात प्रत्यक्ष २ लाख ९९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे, ज्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि उपबाजारात शेतकऱ्यांमधून सोयाबीन विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे जिल्ह्यात विक्रमी २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. अर्थात बाजार मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीवर भर आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात प्रत्यक्ष २ लाख ९९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची (Soyabean) पेरणी झाली आहे, ज्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. सोयाबीन काढणी केल्यानंतर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे. दिवाळीचा सण तोंडावर असल्याने शेतकरी सोयाबीनच्या विक्रीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. या सणासह देणी- घेणी करण्यासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यावर भर देत आहेत. यामुळे (Washim) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. 

बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत. जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि उपबाजार मिळून २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये १२ हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली. तर वाशिम बाजार समितीमध्ये ५ हजार ८०० क्विंटलची आवक झाली होती. मंगरूळपीर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटलची आवक झाली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT