Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim : वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; खरीप हंगामातील ७९३ गावांची सरासरी ४७ पैसेवारी

Washim News : खरीप हंगामातील पीक स्थितीचे वास्तव अधोरेखित करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांत पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार ३० सप्टेंबरला जाहीर

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या परिस्थितीचे प्रतिबिंब हंगामी पैसेवारीत उमटले असून सन २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामातील ७९३ गावांची सरासरी पैसेवारी ४७ अशी जाहीर झाली आहे.

राज्यात यंदाचा पावसाळा नुकसानकारक राहिला आहे. साधारण मे महिन्यापासूनच सातत्याने पाऊस होत आहे. तर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर अतिवृष्टींमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून राज्यात विविध भागात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. दरम्यान वाशीम जिल्ह्यात देखील सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात सहा वेळा अतिवृष्टी 
जून ते सप्टेंबर या कालावधीत पाच ते सहा वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप हंगामातील पीक स्थितीचे वास्तव अधोरेखित करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांत पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार ३० सप्टेंबरला जाहीर झालेल्या पहिल्या पैसेवारीत जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केळीच्या दरात घसरण 

केळी उत्पादक शेतकरी देखील चांगलाच चिंतेत सापडला आहे. कारण केळीचे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळीची लागवड केली. मात्र, यंदा केळीचे दर १२०० रुपयांवरून थेट ५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. ७०० रुपयांनी केळीचे भाव कोसळले आहेत. याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याने शेतकऱ्यांना खर्च निघणंही कठीण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Dussehra Speech: शेतकरी कर्जमाफी,मोदींचा मणिपूर दौरा, आरएसएस मेळावा; मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपचे काढले वाभाडे

Uddhav Thackeray : भाजप अमिबा झालाय, जिथं घुसतो तिथं उध्वस्त करतो; उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून बरसले

Uddhav Thackeray: बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाला पाहिलं, उद्धव ठाकरेंचा नेम कुणावर?| VIDEO

हृदयद्रावक! दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, विसर्जनाहून परतताना ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT