Amalner Accident
Amalner AccidentSaam tv

Amalner Accident : रस्त्यात गाय आली अन् अनर्थ घडला; दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात, महिलेचा मृत्यू

Jalgaon News : रस्त्याने दुचाकीच्या समोर अचानक गाय आल्याने दुचाकीस्वार घाबरून गेले, यात गाडीचा वेग नियंत्रित न झाल्याने दुचाकी थेट गायीला जाऊन धडकली. यामुळे दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला
Published on

अमळनेर (जळगाव) : नवरात्रोत्सव असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविक जात आहेत. त्यानुसार सती मातेचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. दुचाकीने जात असताना रस्त्यात गाय आडवी आल्याने मोटरसायकलची धडक बसली. यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पती जखमी आहे.  

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा रोडवर सदरचा अपघात घडला आहे. यात मंगलाबाई मधुकर ठाकरे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान नवरात्री असल्याने अमळनेर जवळ सुरत रेल्वे लाईनवर जागृत असे सती मातेचे मंदिर आहे. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यानुसार ठाकरे दाम्पत्य देखील देवीच्या दर्शनाला ३० सप्टेंबरला सकाळी आले होते. 

Amalner Accident
Electric Shock : वेल्डिंग काम करताना घडले दुर्दैवी; विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

दुचाकीवर नियंत्रण न मिळाल्याने गायीला धडक 

नवरात्रोत्सव व अष्टमीचा दिवस असल्याने मधुकर नारायण ठाकरे हे त्याची पत्नी मंगलाबाई यांना घेऊन मोटरसायकलने सती मातेच्या दर्शनाला आलेले होते. दर्शन घेऊन घरी परत जात असताना रस्त्यात गाय अचानक आडवी आली. यामुळे मधुकर ठाकरे हे भांबावून गेले. यात दुचाकीला वेग नियंत्रित न झाल्याने गायीला जोरदार धडक बसली. यामुळे पती- पत्नी दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले. 

Amalner Accident
Dhule Crime : नात्याला काळिमा; काकाकडून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संशयित पोलिसांच्या ताब्यात

डोक्याला मार लागल्याने महिलेचा मृत्यू 

यामुळे दुचाकी खाली पडून मंगलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर मधुकर ठाकरे याच्या तोंडाला मार लागला. दरम्यान अपघात झाल्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. यात मंगलाबाई यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर मधुकर पाटील यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com