soyabean price saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनचा दर जैसे थे, शेतकरी चिंतेत

Soyabean Bajar Bhav: सरकारने तातडीने साेयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी उपाययाेजना कराव्यात अशी मागणी हाेऊ लागली आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : सोयाबीनचे दर पाच हजारांपेक्षा अधिक जात नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या वर्षीच्या खरिप हंगामाचे सोयाबीन दर वाढेल (soyabean price) या अपेक्षेने शेतक-याने (farmers) घरात साेयाबीन साठवून ठेवले. मात्र दुसरी खरीपाच्या पेरणीची वेळ आली तरीही दरात वाढ झाली नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. (Maharashtra News)

वाशीमच्या बाजार समितीमध्ये सध्या कमी प्रमाणात सोयाबीन विक्रीस येतंय. त्याच प्रमुख कारण म्हणजे सोयाबीन पडलेले दर. येत्या काही दिवसात पावसाला सुरवात होणार असून शेतकरी खरिपाच्या पेरणीचे नियोजन करत आहे. मात्र, बाजार समितीमध्ये गेल्या 7 महिन्यापासून सोयाबीनचे दर जैसे थे असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांची धाकधूक वाढत आहे. कारण खरीपाची पेरणी नेमकी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा आहे.

सोयाबीन दर किमान 7 हजार रुपये होतील या भाबड्या आशेने शेतक-यांनी सोयाबीन घरीच साठवून ठेवले. मात्र सोयाबीनची दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन कोलमडणार हे निश्चित. दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खाजगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मशागतीचा खर्च किवा मजुरीसाठी लागणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाण इतक्यासाठी थोडेसे सोयबीन घेवुन शेतकरी बाजार समितीत विक्रीस आणत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे काही दिवस! लाडक्या बहिणींनो लगेच eKYC करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००; स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे खूपच जबरदस्त, रेल्वेकडून संपूर्ण प्लान तयार, प्रवाशांना नेमक्या काय सुविधा मिळणार?

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

अमेरिकेत सर्वात मोठा घोटाळा, भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ४००० कोटींच्या लोन फ्रॉडचा आरोप

WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

SCROLL FOR NEXT