Raju Shetti, swabhimani shetkari sanghatana saam tv
ऍग्रो वन

Sugarcane Prohibited Issue : बंदी आदेश ऊसाच्या सरीत गाडून टाकू; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

raju shetti news : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी निर्णयास विरोध दर्शवला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : यंदाच्या हंगामात राज्यात उसाचे उत्पादन आणि पर्यायाने साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उद्योग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत. (Maharashtra News)

गाळप हंगाम 2023 - 24 मध्ये साखर उद्योग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी परराज्यात ऊस घालण्यावर बंधन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात येत आहे. हा आदेश 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. (sugarcane prohibited issue marathi news)

राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाची पुरेपूर वाढ झालेली नाही. या सर्वांचा परिणाम उसाच्या पर्यायाने साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. कर्नाटकचे साखर कारखाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कर्नाटकच्या सीमेवर असलेले कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुढे लातूर जिल्ह्यातील उसाची पळवा पळवी होण्याची शक्यता आहे. असं झालं तर आपल्याकडील साखर हंगाम 100 दिवस ही चालणार नाही. या सर्वांचा विचार करून निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान साखर कारखानदारांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

मागील तीन वर्षांचा हिशोब साखर कारखान्याकडून सरकारला मिळालेला नाही. हा हिशाेब घेतला असता तर शेतकऱ्यांना एफआरपीहुन अधिक पैसे मिळाले असते. त्यामुळे राज्य सरकारला शेजारच्या राज्यात ऊस पाठवू नये असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. या आदेशाला आम्ही उसाच्या सरीत गाढून टाकू असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT