farmers protest in deulgaon mahi  saam tv
ऍग्रो वन

हक्काच्या पाण्यासाठी देऊळगाव महीत शेतक-यांचे शाेले स्टाईल आंदाेलन सुरु

दुसरे रोटेशन संपून जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पीक पाण्याअभावी करपून चालले आहे.

संजय जाधव

बुलडाणा : देऊळगांवराजा (deulgoan raja) तालुक्यातील संत चोखामेळा प्रकल्पाचे पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) वतीने देऊळगाव मही येथील उंच पाण्याच्या टाकीवर असंख्य शेतक-यांनी (farmers) शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. (buldhana latest marathi news)

रब्बी हंगाम सुरू हाेऊन देखील शेतकऱ्यांना संत चोखामेळाच्या पाण्याचे पहिले रोटेशन २२ डिसेंबरला सोडण्यात आले. जवळपास ४० दिवस रब्बी हंगाम पेरणी उशिरा झाली. शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त २ रोटेशनने पाणी मिळाले. दुसरे रोटेशन संपून जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पीक पाण्याअभावी करपून चालले आहे.

याबाबत उपविभागीय अभियंत्यांकडे चाैकशी केली असता थकीत पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थकलेली पाणीपट्टी शेतकरी पाणी पट्टी आकारणी बिल मिळाल्यानंतर भरतील. सद्य:स्थितीत सिंचनाकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाणी त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे सुरेश यांनी केली.

या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे सुरेश यांच्या नेतृत्वात देऊळगाव मही शहरातील फिल्टर प्लांट पाण्याच्या टाकीवर असंख्य शेतक-यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका शेतक-यांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

SCROLL FOR NEXT