Yavatmal: आर्णी, हिवरा संगमला एटीएम मशीन फोडून २० लाखांची चाेरी

एकाही बॅंकेकडून सुरक्षात्मक उपाय योजनेवर भर दिलेला पहायला मिळत नाही. या एटीएममध्ये सेक्युरीटी गार्ड तर सोडाच येथील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद अवस्थेत आहे. एकाही बँकेने बाहेर सीसीटीव्ही लावलेले नाही.
crime news
crime newssaam tv
Published On

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील दोन एटीएम मशीनवर (atm machine) चाेरट्यांनी धाड टाकत लाखाे रुपये लंपास केले आहेत. एका टोळीने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून पैसे पळविले आहेत तर दुस-या ठिकाणी देखील असाच प्रकार करुन पैसे चाेरले आहेत. (yavatmal latest marathi news)

महागाव तालुक्यातील हिवरा संगम (hivra sangam) या बाजार पेठेत एक घटना तर दुसरी घटना आर्णी (aarni) शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवनेरी चौकात घडली आहे. आर्णीत बँक ऑफ इंडियाचे (BAI) एटीएम गॅस कटरने फोडण्यात आले आहे. इथून अंदाजे २० लाख ४३ हजार ५०० रुपयांची चाेरी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस (police) अधिकारी अनिल आडे, आर्णी ठाणेदार पीतांबर जाधव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

crime news
Maharashtra Kesari: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या साता-यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

त्यानंतर श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. ते देखील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शिवनेरी चौकात स्टेट बँक, बॅक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बॅक, सेंट्रल बँकेचे एटीएम आणी एक पतसंस्था आहे. परंतू एकाही बॅंकेकडून सुरक्षात्मक उपाय योजनेवर भर दिलेला पहायला मिळत नाही. या एटीएममध्ये सेक्युरीटी गार्ड तर सोडाच येथील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद अवस्थेत आहे. एकाही बँकेने बाहेर सीसीटीव्ही लावलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

crime news
Crime News: गावठी कट्टा प्रकरणी कर्जतच्या तिघांना अटक; एलसीबीची कारवाई
crime news
राष्ट्रपती पदकासाठी तयार केली बनावट कागपदत्र; वानवडीत हवालदारासह तिघांवर गुन्हा दाखल
crime news
World Cup: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झुलन गोस्वामीनं 'या' विश्वविक्रमाशी केली बरोबरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com