राष्ट्रपती पदकासाठी तयार केली बनावट कागपदत्र; वानवडीत हवालदारासह तिघांवर गुन्हा दाखल

या प्रकारमुळे पुणे शहर पाेलिसांत खळबळ उडाली.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

- गाेपाल माेटघरे

पुणे : राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या पुणे शहर पोलिस (pune city police) दलातील पोलिस (police) हवालदारासह तिघा लिपीकांवर वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुणे (pune) शहर पाेलिसांत एकच खळबळ उडाली आहे. (pune latest marathi news)

याबाबत वानवडी पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : राष्ट्रपती पदकासाठी (Presidents Medal) बनावट कागदपत्रे तयार केल्याने गणेश अशोक जगताप या पोलिस हवालदारावर गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिका-यांनी जगताप याची वेतनवाढ राेखली हाेती. त्याबाबतची शिक्षा दिली असताना देखील त्याने लिपीकांशी संगनमत करुन राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी खाेटा खटाटाेप केला.

Crime News
Maharashtra Kesari: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या साता-यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

जगताप याने सर्व्हिस शीटची पाने फाडून तेथे बनावट पाने जोडली आणि शासनाची फसवणुक केली. त्याच्यासह सह लिपीक नितेश आरविंद आयनूर, रविंद्र धोंडीबा बांदल आणि एका ठाणे अंमलदारावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Crime News
Maharashtra Budget 2022 LIVE: अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; याकडे सर्वांचं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com