Grapes Farming Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farming: द्राक्ष बागेची संरक्षण शेती; शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानपासून शेतकरी मात्र वंचित

Sangli News : सांगलीच्या पलूस येथील शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली. त्यात वेळोवेळी बदलते वातावरण अवेळी पावसाची आगमन होत असल्यामुळे येणारे रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले

विजय पाटील

सांगली : नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी संरक्षण शेती करणे गरजेचे ठरते आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस (Palus) तालुक्यातील नागठाणे येथील तब्बल नऊ शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेला कागदाने झाकून संरक्षण शेती केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. पण शासनाकडून मिळणाऱ्या (Sagnli) अनुदानापासून हे शेतकरी वंचित राहिले आहेत. शासनाच्या यादीत शेतकऱ्याचे नावे असून सुद्धा त्यांना लाभ देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. (Latest Marathi News)

सांगलीच्या पलूस येथील शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली. (Grapes Farming) त्यात वेळोवेळी बदलते वातावरण अवेळी पावसाची आगमन होत असल्यामुळे येणारे रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. चोहोबाजूंनी हे (Farmer) शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नऊ शेतकरी पात्र मात्र अनुदान नाकारले 

शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत संरक्षक शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे. तब्बल नऊ द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले. त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती. सोडतीत तालुक्यातील नऊ शेतकरी पात्र ठरले. मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी अधिकारी यांच्याकडे विचारपूस केली असता अधिकारी मात्र नियमांवर बोट ठेवून अनुदान नाकारत आहेत.

५ लाखाचा खर्च 
पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगाडा तयार करून प्लास्टिक कागद घालण्यात आले. हे काम पिक छाटण्या झाल्यानंतर लगेचच केले जाते. त्यासाठी प्रति एकरी पाच लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता. यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही. शेतकऱ्यांनी उसने उचलून व्यवस्था करून शेतकरी कागद घातला. पण यासाठी अनुदानाची ही योजना आहे. मात्र कागद आधी कशाला घातला, आम्ही सांगू तिथे साहित्य खरेदी करावे लागेल; असे सांगून हे अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

Viral Video: छातीत गोळी अन् डोळ्याखाली पट्टी, तरीही आंदोलनात उभा राहिला तरूण; व्हिडीओ

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

स्मशानभूमीत लिंबू-खिळ्यांचा थरार; गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट|VIDEO

SCROLL FOR NEXT