Grapes  Saam tv
ऍग्रो वन

Grapes : बेदाणा उत्पादकांना यंदा सुगीचे दिवस; उत्पादन घटल्याने प्रतिकिलो दरात ४० रुपयांनी वाढ

Sangli News : मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलला तयार झालेला ३५ हजार टन बेदाणा बाजारात येतोय. मागील वर्षी ६० हजार टन बेदाणा शिल्लक होता. अडीच ते पावणेतीन हजार गाडी नवीन बेदाणा बाजारात येत होता

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. यातून बेदाणा उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. दरम्यान यंदा बेदाणा उत्पादन उशिराने होणार असल्याने बाजारात देखील बेदाणा उशिराने दाखल होणार आहे. दरम्यान दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रति किलो सरासरी ४० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे बेदाणा उत्पादकांना यंदा चांगला फायदा होणार आहे.  

मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलला तयार झालेला ३५ हजार टन बेदाणा बाजारात येतोय. मागील वर्षी ६० हजार टन बेदाणा शिल्लक होता. त्याचवेळी अडीच ते पावणेतीन हजार गाडी नवीन बेदाणा बाजारात येत होता. त्यामुळे यंदा ही आवक केवळ २० गाड्यावर आली आहे. आता रमजान आणि होळी सणासाठी देशभरातून बेदाण्याला मागणी वाढते. तर नवीन बेदाणा बाजारात येण्यासाठी मार्च अखेर उजडणार आहे. 

उत्पादन घटल्याने दरात वाढ 

दरम्यान आता ज्या शेतकऱ्यांनी आगाप बागांची छाटणी केली आहे. त्या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे बाजारात द्राक्ष कमी आले आहेत. त्यामुळे ४० ते ४५ टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. त्यामुळे जुना बेदाणा सणासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

२५० रुपयांपर्यंत भाव जाण्याची शक्यता 

सध्याची आवक आणि बाजारात उपलब्ध जुना बेदाणा बाजारात येत आहे. परिणामी यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचे संकेत आहेत. एक महिना लवकर म्हणजे मार्चमध्ये होळी आणि रमजान सण आहेत. येत्या महिनाभरात मागणी वाढल्यास बेदाण्यास २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे. नैसर्गिक संकटामुळे ४० टक्के द्राक्ष उत्पादन घटल्यामुळे ही द्राक्षाला चांगला दर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT