Tomato Farming : पाऊण एकर शेतीमध्ये टोमॅटो लागवड; शेतकरी काढतोय लाखो रुपयाचे उत्पन्न

Maval News : मावळ येथील शेतकरी सुनील किरवे यांनी टोमॅटो लागवड केली आहे. सध्या टोमॅटो परिपक्व होऊन लाल होत आहेत. यामुळे तोडणी करून ते विक्रीसाठी बाजारात नेत असल्याने त्याला चांगला भाव
Tomato Farming
Tomato FarmingSaam tv
Published On

मावळ : इंद्रायणी भाताचं आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळात आता शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. हे प्रयोग यशस्वी करत चांगले उत्पादन शेतकरी घेत आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. शेतातील भाताचं पीक काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. याच प्रमाणे मावळ मधील एका शेतकऱ्याने पाऊण एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड करत लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे. 

पारंपरिक शेती करत असताना यातून फारसे चांगले उत्पादन मिळत नाही. मात्र या पारंपरिक शेती न करता वेगळा प्रयोग काही शेतकरी करत आहेत. यामुळे शेती करणे परवडत आहे. त्यानुसार मावळ येथील शेतकरी सुनील किरवे यांनी टोमॅटो लागवड केली आहे. सध्या टोमॅटो परिपक्व होऊन लाल होत आहेत. यामुळे तोडणी करून ते विक्रीसाठी बाजारात नेत असल्याने त्याला चांगला भाव देखील मिळत आहे. 

Tomato Farming
Farmer Success Story : सेंद्रिय गुळ उत्पादनात शेतकरी महिलेची भरारी; वर्षाकाठी घेताय १० लाखाचे उत्पन्न

गावरान टोमॅटोची लागवड  

मावळ मधील सुनील किरवे यांनी केवळ पाऊण एकर क्षेत्रात श्रेया जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली आहे. यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे. केवळ ५० ते ६० हजार रुपये खर्च त्यांना या टोमॅटोची बीज आणि लागवड करताना आला आहे. घरच्या घरी टोमॅटोची रोपे तयार करून त्यानंतर त्यांनी शेतात ही रोपे लावली. संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर करून टोमॅटोची शेती किरवे यांनी फुलवली आहे. बाजारात या गावरान टोमॅटोना साध्या टोमॅटो पेक्षा ५ ते १० टक्के भाव जास्त मिळत आहे. शिवाय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या टोमॅटोची मागणी आहे.

Tomato Farming
Jalgaon Jamod News : पूर्णा नदीतील वाळू उपशावर तहसीलदारांची कारवाई; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोसंबी आंब्या बहराला वातावरणाचा फटका

जालन्यातील अंबड तालुक्यातील मोसंबी उत्पादकांना सततच्या वातावरण बदलाचा फटका बसला आहे. सततच्या वातावरण बदलामुळे मोसंबीच्या आंब्या बहराच्या फळांना बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी पडत असल्याने मोसंबीचा आंब्या बहर फोडताना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com