Raghunath Dada Patil, Sangli
Raghunath Dada Patil, Sangli  saam tv
ऍग्रो वन

Sangli Court : 'दत्त इंडिया' च्या संचालकांवर FRP प्रकरणावरुन गुन्हा दाखल हाेणार : रघुनाथदादा पाटील

विजय पाटील

Sangli News : कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असणारी एफआरपी कारखान्यांकडून देण्यात येत नसल्याने शेतकरी संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये आता राज्यातला ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. सांगलीच्या (sangli) वसंतदादा पाटील संचलित दत्त इंडिया साखर कारखान्याच्या (datta india sugar factory sangli) संचालकांवर एफआरपी प्रकरणी गुन्हे दाखल करून संबंधित शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश सांगली न्यायालयाने दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (raghunath dada patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra News)

देशात एक रक्कम ऊसाची एफआरपी देण्याबाबतचा कायदा आहे. मात्र 14 दिवसात एफआरपी देण्यात येत नाही. तुकडे करून तेही उशिराने देण्यात येतात. त्यामुळे शेतकरी संघटनेच्यावतीने दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या विरोधात सांगलीच्या न्यायालयामध्ये धाव घेतली होती.

याप्रकरणी सांगली न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि राज्यातला पहिलाच निकाल दिला आहे. यामध्ये दत्त इंडियाचे प्रोप्रायटर आणि संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन संबंधित उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश बजावल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा निकाल राज्यातच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक निकाल असल्याचे,मत ही रघुनाथ दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कॉंग्रेससमोर नकली शिवसेनेने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींची टीका

PM Narendra Modi Road Show | पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये ३० फुटाची राम मंदिराची प्रतिमा

Office Tips : ऑफिसमध्ये बसल्या बसल्या झोप येतेय? या ५ चुका सुधारा

Sindhudurg : झुलत्या पुलानजिक पोहण्याच्या मोह आला अंगलट, वेंगुर्ल्यात युवकाचा बुडून मृत्यू, मच्छिमारांनी एकाला वाचवले

SBI Interest Rate Hike: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खुशखबर! FD वरील व्याजदर वाढवले; व्याजाचं गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT