वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ला आजपर्यंतचा विक्रमी दर ! गजानन भोयर
ऍग्रो वन

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ला आजपर्यंतचा विक्रमी दर !

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उच्चांकी दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. सोयबीनला प्रति क्विंटल मिळालेला आजपर्यंतचा हा सर्वात जास्त दर आहे.

हे देखील पहा -

सोयाबीनला शासकीय आधारभूत किंमत 3880 रुपये असताना हा मिळालेला दर अडीचपटीने जास्त असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सोयाबीनच्या हंगामात दर चार हजार रुपये असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची आधीच विक्री केली आहे. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त होत असल्याचे बोलले जात आहे.

सोयाबीन पिकाचा नवीन हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिन्यादरम्यान असतो. मात्र, तोपर्यंत हे दर कायम राहतील का असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. वाशिम जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख हेक्टरच्या वर सोयाबीन ची पेरणी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन ला मिळालेला दर हा आजपर्यंतचा उच्चांकी दर आहे. हाच दर येणाऱ्या हंगामात सोयाबीनला मिळाला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होणार यात शंका नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

SCROLL FOR NEXT