रायगड येथे भाताची गंजी जळून खाक; हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी  राजेश भोस्तेकर
ऍग्रो वन

रायगड येथे भाताची गंजी जळून खाक; हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी

हाता तोंडाशी आलेले खंडीभर पीक जळून खाक झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अतिवृष्टी त्यातचवेळी पडत असलेल्या पावसाने रायगडातील शेतकरी हा चिंतेत होता. यातच अलिबाग तालुक्यातील नेहुली गावातील शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने हाता तोंडाशी आलेले खंडीभर पीक जळून खाक झाले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केला आहे.

हे देखील पहा-

मात्र, ही आग नक्की कशाने लागली याचे कारण अद्याप आजून देखील कळले नाही. याबाबत आता प्रशासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भात पीक घेतले होते. उत्तम पडलेल्या पावसाने भात पीक चांगले बहरले होते. भात पीक तयार झाल्यानंतर कापणी करून, शेतातच पीक पसरून ठेवले होते.

दुपारच्या सुमारास भात पिकाला आग लागल्याचे पाटील यांच्या कुटूंबाने शेताकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना अपयश आले. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर जळून गेल्याने शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. याबाबत त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने याबाबत आता लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आग नक्की कशाने लागली याचे कारण कळले नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT